
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय , यवतमाळ येथील विद्यार्थी यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जमदोह( तळेगाव ) येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.निखिल भागवते सर यांचा मार्गदर्शनात जनवरणांना लसीकरण करण्यात आले.शेतकऱ्यांना जनावरांना होणारे पावसाळ्यातील आजार घटसर्प लसी इत्यादी विविध रोगांबद्धल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए.ठाकरे सर उपप्राचार्य कडू सर विषय तज्ञ एस पी. लोखंडे मॅडम कार्यक्रम अधिकारी एस व्ही.महानुर सर यांचे विशेष मार्गर्शन लाभले. यावेळी कू.पायल राऊत, कू अनुष्का चौधरी,आदित्य यादव ,ऋषिकेश रणनवरे,श्रेयस शिरभाते ह्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
