
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) क्स
कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी प्रणय साहेबराव मुन,सुमेध सुरेशराव भोयर,वैभव रवींद्र गावंडे,चैतन्य नरसिंग राठोड यांनी कारेगाव( यावली) येथील शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्स (माती विना कमी खर्चात घेणारा जनावरांचा चारा) याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी किसनराव गोसावी, शिवदास लिहितकर, आनंदा सिडाम यांना माहिती देण्यात आली. तसेच हा उपक्रम घेताना (प्राचार्य) डॉ.आर.ए.ठाकरे (उपप्राचार्य) पी.व्ही.कडू कार्यक्रम अधिकारी प्रा. सौरभ महानुर व विषय शिक्षक प्रा. स्नेहल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
