
शासकीय अधिकारी आणि नेते मंडळी यांची जनतेशी असलेली एकनिष्ठता आणि कामात प्रामाणिक पणा हा लोकशीहिला बळ प्रदान करून देशात सुव्यवस्था कायम राखण्यास महत्वाचे मानले जाते .पण दिवसेन दिवस शासकीय कर्मचारी आणि नेते मंडळी यांच्या संगनमताने देशात होत असलेला भ्रष्टाचार हा जनतेच्या मनात रुतत असल्याचे पाहायला मिळत आहे .
जनतेचा देश्यातील लोकशाही व्यवस्थेतून जनतेचे विश्वास कमी होत जातं असल्याने ही बाब अतिशय चिंता जनक असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांन कडून ऐकावयास मिळत आहे.पोलीस प्रशासन आणि इतर शासकीय विभागाच्या साहाय्याने भ्रष्टाचाराचा विरोध करणाऱ्यांन वरती दडपण आणून भ्रष्टाचारा विरोधातील आवाज जागीच दाबला जातो .
एखाद्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल होतात तर एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याची तंबी दिली जाते .
शासकीय योजनेतून जनतेला ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या सुविधे मुळे देशातील गरीबी आणि दारिद्रता दूर होऊन जनतेला समानता प्रदान व्हावी व देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समृद्धीने जगावा हेतूने जनतेकडून कर आकारणी करून या प्रकारच्या योजना जनतेला पुन्हा अर्पण केल्या जातात
या योजना जनतेपर्यंत पाहोचवण्याचे काम शासकीय कर्मचारी आणि नेते मंडळींचे आहे पण एक मेकांशी संलग्न होऊन योजनेत भ्रष्टाचार करत असल्याने देश्यात गरिबी आणि दरिद्री प्रमाण वाढत जात आहे ज्यामुळे गुन्हेगारी आणि निरक्षरता देखील वाढत आहे.
देशातील प्रशासकीय विभाग हा भ्रष्टाचाराने बरडला असल्याने ही एक चिंतेची बाब मानली जाते.
