
या बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली .
- मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसीं प्रमाणे आरक्षण मिळावे . आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा व मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा अशी विनंती आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना करण्यात आली
2.2014 ESBC 2019/19/20 2021/22 EWS आरक्षणातून डावलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट आदिसंख्य पदे निर्माण करून तात्काळ निर्णय घ्यावा .
3.सारथी / अण्णासाहेब पाटील महामंडळावर रिटायर अधिकाऱ्यांची तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी त्याचप्रमाणे सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त मराठा समाजासाठी सीमित करावे.
4.मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरसकट फी माफीचा निर्णय घ्यावा यासाठी अति गरीब असणारे ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग शालेय शिक्षण या सर्व विभागांमध्ये संपूर्ण फी माफी करावी
5.वस्तीग्रह निर्वाह भत्ता इतर समाजाप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये साठ हजार जिल्हा विभागामध्ये 51 हजार त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 40 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा त्याचप्रमाणे राज्यात संस्थ्याच्या नावाखाली चालू असणारी वसतिगृह सर्व सारथीसंस्थेकडे वर्ग करावी वस्तीगृह सारथी संस्थेमध्ये मार्फत चालू ठेवावीत त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावित . - ग्रामीण भागातील शेतकरी मजूर भूमिहीन या सर्व गरिबांना ज्यांचे उत्पन्न आठ लाखापर्यंत आहे अशा सर्व लोकांना घर बांधण्यासाठी वार्षिक एक टक्के व्याज दराने पाच लाख रुपये सोसायटी जिल्हा बँक सहकारी बँका राष्ट्रीय बँका यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात यावे यामुळे ग्रामीण भागातील 70 टक्के मोडकळीस आलेले घर किंवा गोरगरिबाचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
- राज्यात 52 टक्के आरक्षण EWS 10 दहा टक्के आरक्षण एकूण 62 टक्के असताना सर्व समाजाच्या आरक्षित जागा भरून घेतल्या जातात या आरक्षित जागा असताना पुन्हा खुल्या वर्गातील जागा गुणवत्तेनुसार जागा दिल्या जातात यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना जागा शिल्लक राहत नाहीत खुल्या वर्गासाठी फक्त दहा टक्के जागा शिल्लक राहतात यामध्ये एखाद्या विभागांमध्ये 100 जागा निघाल्या असतील तर 62% आरक्षणामध्ये जातात तर गुणवत्तेनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुन्हा खुल्या वर्गातील जागा दिल्या जातात यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वरती फार मोठा अन्याय होतो हा अन्याय दूर करण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा व आरक्षित जागावरती आरक्षणाचेच विद्यार्थी द्यावेत व खुलावर्गाच्या जागा खुल्या वर्गासाठी शिल्लक ठेवाव्यात.
- सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळास प्रत्येक संस्थेला एक हजार कोटी निधी देण्यात यावा
- मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात समाजातील युवकांना समन्वयकांना ज्यांना निवेदन द्यायचे आहेत किंवा पाठपुरावा करायचा आहे यासाठी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी ज्यामुळे समाजातील संघटना असतील समन्वयक असतील किंवा युवक वर्ग असेल ज्यांना मराठा आरक्षण किंवा इतर मागण्यांचा जो पाठपुरावा करायचा आहे तो डायरेक्ट अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाठपुरावा करता येईल अशा अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये वरील सर्व विषयाची निवेदने माननीय मुख्यमंत्र्यांच्या कडे देण्यात आली व सर्व विषयासंदर्भामध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली यातील बहुतांश भागव्या रात्री माननीय मुख्यमंत्री यांनी मान्य केलेले आहेत या सर्व मागण्यांच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ आणि जाहीर करू अशी आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले यासंदर्भामध्ये लवकरच राज्यातील सर्व समन्वयक दोन्ही राजे यांना एकत्रित बोलून सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती मान्य मुख्यमंत्री साहेबांना करण्यात आली आणि या विनंतीला मान देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व समन्वयक दोन्ही राजे यांच्या सोबत राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामुळे आज होणारे आंदोलन आम्ही स्थगित केलेले आहे.
