समाजसेवक नानाजी मोकडे जि.प.पिंपळखुटी शाळेत मोफत नोटबुक वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

केंद्रांतर्गत जि. प.उ.प्रा.शाळा पिंपळखुटी येथे दि.७/७/२०२२ रोजी ,दानी को पहले ज्ञानी होना चाहीये। या वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या विचारप्रमाणे” जि. शाळांविषयी असणारा जिव्हाळा आणि ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या प्रेमापोटी”गावातील सुस्वभावी,सेवाभावी,अभ्यासू व दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे आदरणीय नानाजी मोकडे यांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते वर्ग १ते ७ च्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.राळेगावचे माजी सभापती मा. प्रशांतभाऊ तायडे होते.तर यावेळी सरपंच मा.अंजलीताई तायडे,उपसरपंच मा.संघरक्षित गावंडे,पोलीस पाटील मा.बबनराव झलके, मुख्य संयोजक मा.नानाजी मोकडे व त्यांच्या पत्नी इंदूताई आदी मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमात जि. प.कर्मचारी पतसंस्था र.जि. नं.१०९यवतमाळ च्या संचालकपदी राळेगाव तालुक्यातून निवड झाल्याबद्दल शाळेतील विषय शिक्षक महेश सोनेकर यांचा मा.प्रशांतभाऊ तायडे यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांचा शाळेच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आला.
एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन खर्च न करता आमच्या विद्यार्थ्यांना आदरणीय नानाजी मोकडे काकांनी जवळपास १२ ते १३ हजार रुपये किमतीचे शालेय पयोगी नोटबुक देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेच्या वतीने आदरणीय मोकडे काकांचे शतशः आभार🙏