मुख्यमंत्र्यांशी अंबिका सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अंबिका हिंगमिरे यांची सिंधूताई सपकाळ यांच्या स्मारकाबद्दल चर्चा

:-सदिच्छा भेटीदरम्यान सकारात्मक आश्वासन.

वर्धा/प्रतिनिधी/पियुष रेवतकर

वर्धा / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार सांभाळला . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंबिका सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अंबिका हिंगमिरे यांनी भेट घेत सिंधूताई सपकाळ यांच्या स्मारकाबद्दल चर्चा केली . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले .
सोशल अंबिका फाउंडेशनच्या संस्थापक अंबिका हिंगमिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटून जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली . पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा सर्वसामान्यांचा आणि हक्काचा दिल्यात . नेता मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळणार असल्याने राज्याचा विकास होईल , असा ठाम विश्वास हिंगमिरे यांनी व्यक्त केला .