
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यातील अर्जुनी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आज रविवारला दुपार ३.३० वाजताचे सुमारास निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक इसमाचा नेमका मृत्यू कशाने की घातपात याबाबत तर्कवितर्काला कमालीचे उधाण आले आहे.मारेगाव तालुक्यातील हिवरी येथून अर्जुनी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत अंदाजे चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह गुरख्यास आढळून आला.काहीसा मळकट रंगाचा पॅन्ट व गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेल्या इसमाची अजून पर्यंत ओळख पटली नाही.
दरम्यान , सदर इसमाचा मृत्यू नेमका कशाने झाला या बाबत तर्कवितर्काला कमालीचे उधाण आले आहे.परिणामी घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर बीट जमादार भालचंद्र मांडवकर घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतकाचा मृत्यू नेमका कशाने झाला की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून चाचपणी करून तपासाची चक्रे जलदगतीने फिरविली आहे.उत्तरीय तपासणी करिता मृतदेह मारेगाव रुग्णालयात आणण्याच्या हालचाली सुरू आहे.वृत्त लिही पर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
