
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दि१८२ २०१९ रोजी सुरु झालेलं तलाव सौंदर्यीकरणाचं काम नियोजित निधी न मिळाल्याने अद्यापही रखडलेल्या अवस्थेत च॔ आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत राळेगांव येथे सरोवर व बगिच्याचे सौंदर्यीकरण व विकासकामे करणे या साठी अंदाजित किमंत ₹ ३,४९,४०,२७४ एवढी निर्धारित ठरली होती. मे.गुघाणे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.यवतमाळ या कंत्राटदारांनी हे काम घेतलं. दिनांक १८०२२०१९ रोजी याची सुरुवात झाली. कामाचा कालावधी बारा महिने होता.दोष दायीत्व कालावधी दोन वर्षे असा करार सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा सोबत झाला.यावर देखरेख सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगांव यांची आहे.
मात्र दोन वर्षे पर्यटन विकास निधी या कामाला मिळाला च नाही. कंत्राटदाराने सत्तर टक्के काम पूर्ण केल्या नंतर,झालेल्या कामाचा निधी आता ही उपलब्ध झाला आहे.उर्वरित निधी उपलब्ध झाल्या शिवाय तलाव सौंदर्यीकरणाचं काम पुढे सरकेल याची चिन्हं दिसेना. कारण दोन वर्षे कंत्राटदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सर्व तलाव सौंदर्यीकरणाचं कामं अखेर पर्यंत पाच कोटी रुपयांचे होईल,यात जी.एस.टी.वेगळा. आता ग्रेनाईड सह चार ही बाजूने गट्टू चा नविन रस्ता सह इतर सजावटी ची कामे शिल्लक आहेत..
निधी का रखडला? याची नानाविध कारणं समोर येत आहे. दोन वर्षे कोरोणा महामारी,आणि महाराष्ट्र राज्यात महाविकासआघाडी चे सरकार असल्याने,७७ राळेगांव विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार हे ही एक कारण नाकारता येत नाही.
पंधरा वर्षापुर्वी उजाड जागेवर काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदारांनी हा परिसर भरभक्कम निधी देऊन सुशोभित करुन शहरात प्रवेश करतानाच हा परिसर निसर्गमय हिरवागार करुन,तलाव खोलीकरण दोन्ही आमदारांनी करुन पाण्याची पातळी वाढवली.भर उन्हाळ्यातही बेंबळा प्रकल्प कालव्याच पाठणी थेट तलावात येण्याची वाट करुन दिली आहे.
आता पर्यंत केलेल्या कामामुळे परिसर शोभिवंत झाला आहे
या उद्यानाचं नेमकं खर नाव काय?
या उद्यानाचं सर्व प्रथम नुतनीकरण करण्यात आले त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सरांनी याचं नामकरण संत कबीर उद्यान असं केलं होते. त्यानंतर शिवसेना राळेगांव तालुक्यच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असा नामफलक प्रथम दर्शनी फाटकावर लावण्यात आला होता. पण नगर पंचायत राळेगांव च्या मागील पंचवार्षिक मध्ये भाजपा ने या उद्यानाचं नामकरण स्वामी विवेकानंद उद्यान केल्याचा लेखी ठराव बहूमताने पास केल्याची अधिकृत माहिती आहे.
