
.
आज दि. १२ जुलै २०२२ ला शाळा व्यवस्थापन समिती साखरा राजाचे अध्यक्ष , सदस्य व गावकरी यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील जुन्या इमारतीचे निरिक्षण केले . तीन वर्षांपूर्वी याच इमारतीची पावसाळ्यातील दैनावस्था पाहून गावक-यांनी शाळेला कुलूप ठोकून शाळाबंद आंदोलन केले होते तेव्हा त्यावेळच्या पं. स. सभापती देवतळे मॕडम यांनी सोबत पं. स. इंजिनिअर यांना व काही पं. स. सदस्य यांना सोबत घेऊन मुसळधार पावसात साखरा शाळेला भेट दिली असता शाळेची दैनावस्था पाहून तेव्हाच्या तेव्हाच या शाळेच्या पाच वर्ग खोल्यांच्या स्लॕप दुरुस्ती , संपूर्ण वर्गखोल्यांना टाईल्स व रंगरंगोटीचे इस्टीमेट तयार करण्याचे आदेश इंजिनिअर पं. स. वरोरा यांना दिले होते . या संपूर्ण कामाचे रु 750000/- ( सात लक्ष पन्नास हजार रुपयांचे ) इस्टीमेट मंजूर सुद्धा झाल्याचे जि. प. चंद्रपूर कार्यालयातून चौकशीअंती सांगण्यात आले होते . सभापती मॕडम यांनी आश्वासन दिल्यामुळे शाळेला कुलुप ठोकण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले होते . मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्ष शाळा पावसादरम्यान बंदच होत्या . या वर्गखोल्या पावसाळ्यात वर्ग भरविण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असतांनाही प्रशासन या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे . सहा महिन्यांपूर्वी याच शाळेतील मुलांच्या स्वच्छता गृहाची इमारत वरोरा पं. स. च्या इंजानिअर ने कोणतेही निर्लेखनाचे आदेश नसतांनाही जमिनदोस्त करुन त्याठीकाणी अंगणवाडीचे बांधकाम केलेले आहे . सदर बाबतीत शाळा व्यवस्थापन समितीने आत्तापर्यंत अनेकदा वरीष्ठ कार्यालयास शाळा व्यवस्थापन समिती सभेत ठराव पारित करुन कळविलेले आहे तरीसुद्धा प्रशासन या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास येत आहे . निर्लेखनाचे आदेश नसतांनाही एखादी अधिकारी एखादी सरकारी इमारत पाडूच कशी शकतो ? हा गावक-यांचा रास्त प्रश्न आहे . पं. स. वरोरा मधिल साखरा शाळा ही एकमेव मुलांचे स्वछता गृह नसलेली शाळा आहे . शाळेची इमारत मुलांना बसविण्या योग्य नसल्यामुळे शाळेच्या नविन बांधलेल्या दोन वर्गखोल्यांमध्ये १ ते ७ चे वर्ग बसविण्यात येतात . शाळेचा पट या वर्षी १२५ असल्यामुळे या दोन वर्गखोल्यांमध्ये मुलांना बसविणेही शक्य नाही . त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा पावसाळा संपेपर्यंत किती दिवस सुरु राहिल हे सांगता येत नाही . या वेळी प्रशासनाने शाळेची , ईमारत व मुलांचे स्वच्छतागृह याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक पिरके यांनी दिला आहे . शाळा भेटी दरम्यान स्वतः अध्यक्ष दिपक पिरके , सदस्य मनोज उमरे , किसन काळे , सुभाष निखाडे व विद्या मोहरे व गावकरी उपस्थित होते
