उखर्डा पाटी ते नागरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे:तहसीलदार यांना निवेदन


रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा


रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे


वरोरा:– ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संपूर्ण तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून प्रशासन साखर झोपेत आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील रस्त्यांची डागडुजी करण्याची तसदी घेतली जात नाही. आंदोलन करुन देखील या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग येत नाही. गेल्या वर्षी पासुन या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन, आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा प्रशासनाने पाऊल उचलले नाही. उखर्डा पाटी ते नागरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित प्रभाकरराव कुडे यांनी उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे .
रस्त्याच्या खड्ड्यांनी प्रवास करताना अनेक अपघात होत आहे लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
रस्त्याने सगळी कडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे, वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी रोशन भोयर, विजय कुडे उपस्तीत होतें..
फक्तं एक च रस्त्या नसून संपूर्ण तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था तशीच आहे हे चित्र सगळी कडे आहे:
रस्त्यात खड्डे आहेत की खड्डात रस्ता आहे हे देखील समजत नाही –अभिजित प्र. कुडे