

सहसंपादक:प्रशांत बदकी ,
संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोरोनावर उपलब्ध झालेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसी 45 वर्ष च्या वर वय असलेल्या नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या.
वरोरा तालुक्यातील सर्व नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे 16/04/2021 ला लसीकरणाची सुरुवात झाली .परंतु अपुरा पूरवठा असल्यामुळे लसीकरण बंद झाले .
लसीकरणाबाबत जागरूक असलेल्या नागरिक रोज या लसीकरण केंद्रावर येतात व परत जातात .त्यामुळे लस मिळावी यासाठी सकाळपासून या केंद्रावर नागरिकांची गर्दी पहायला मिळायची .त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाकडून टोकन पद्धत सुरू करण्यात आली .यात नागरिकांना टोकन दिल्यानंतर त्यांना लस देण्यात येते.त्यामुळे या टोकन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी व्हायची.काल दिनांक 12 /05/2021 ला रात्री लसीकरणाचे टोकन मिळावे म्हणून नागरिकांनी रात्री12 वाजताच रांग लावली .त्यामुळे संचारबंदी व कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली .एकीकडे सरकार म्हणतेय की लस घ्या दुसरीकडे लस उपलब्ध होत नाही त्यामुळे सामान्य नागरिक मात्र द्विधा मनस्थितीत पडले आहे .
लसीकरण केंद्रावर टोकन साठी होणारी गर्दी देखील कोरोना प्रसाराचे कारण ठरू शकते त्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहे.या गर्दी मुळे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभा झाला आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने संगनमताने लसीकरण केंद्रावर योग्य व्यवस्थापन करत ,केंद्रावर आलेल्या नागरिकांची नोंदणी करीत त्यांना लस उपलब्ध असेल त्यावेळेस पूर्वसूचना देऊन बोलावल्यास गर्दी नियंत्रणात येऊन योग्य प्रकारे लसीकरण होईल व कोरोना नियमांचे देखील पालन होईल अशी सूचना त्यांनी केली आहे .या साठी ते लवकरच आरोग्य अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी प्रतिनिधी ना सांगितले आहे.
