
वरोरा
शहरानजीकच्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या वसाहतीमधील 17 वर्षीय मुलीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सानिका संजय माटे (17) राहणार इंद्र नगरी बोर्डा असे मृतकाचे मुलीचे नाव असून ती बारावी मध्ये शिक्षण घेत होती. नवी दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गावरील वरोरा शहरानजीकच्या बोर्डा रेल्वे पुलानजीक रेल्वेखाली येऊन तिने आत्महत्या केली. ती घरून रात्रीच निघून गेली होती. सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वरोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे व त्यांचे सहकारी करीत आहे.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
