परसोडा मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छता अभियान

   तालुक्यातील परसोडा येथे गट ग्रामपंचायत परसोडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज परसोडा गावामध्ये जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती च्या निमित्ताने स्वच्छता अभियान आणि भंजच दिंडी चे  आयोजन करण्यात आले होते  कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करणयात आली.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप दडमल  सरपंच गट ग्रामपंचायत परसोडा प्रमुख पाहुणे मा.रमेश पावडे उपसरपंच मा गेडाम सचिव सदस्य गण श्री  सुनील कुरेकार सौ.रुपाली मडावी   आरती गारघाटे ललिता कळसकर श्री निरंजन परचाके. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, जि.प.शाळा मुख्यधापक श्री.विजय उमरे श्री.शुभम आमने उपाध्यक्ष शारदा फाउंडेशन व अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ परसोडा उपस्थित होते.
              हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने राज्यात ग्रामपंचायत स्थरावर राबविण्यात सांगितला आहे म्हणून आपल्या गावात पण कार्यक्रमाचे नियोजन ग्रा. प. ने केले कार्यक्रम हा जि.प. शाळेपासून भजन दिंडी काढत गावातल्या रस्त्यावर असलेला घाण, कचरा स्वच्छ करण्यात आला नंतर पुढील कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला त्या प्रसंगी ग्रा. प.सचिव गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्व लहान मुलांना पटवून दिले  त्या नंतर श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा चे जेष्ठ सदस्य मा नारायण पावडे हे वयाच्या 70 व्या वर्षी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे कार्य हाती घेऊन रोज सकाळी संपूर्ण गावाची साप-सफाई करते असते म्हणून जि. प.शाळेचे मुख्याध्यापक मा विजय उमरे यांनी त्यांचा सत्कार केला सत्कार नंतर नारायण पावडे यांनी बोलताना सांगितले की हा सत्कार माझा नसून माझ्या गुरुदेव सेवा मंडळाचा आहे असे सांगितले त्यानंतर गुरुदेव भजन मंडळ परसोडा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्धल त्याचा सुद्धा ग्रा. प. च्या वतीने सन्मान करण्यात आला त्या नंतर अध्यक्ष भाषण मा संदीप दडमल सरपंच यांनी मार्गदर्शन करत असताना सांगते की परसोडा गावात विविध कार्यक्रम होत असतात अतिशय आनंद होत आहे की गुरुदेव सेवा मंडळ परसोडा हे नेहमी गावाच्या कल्याणासाठी विविध भजन, कीर्तन,रंगमुक्त होळी , पुण्यतिथी असे समाजप्रबोधना चे कार्यक्रम नेहमी घेत असते आपण सर्व गावातील विविध मंडळ, ग्रा. प. जि. प शाळा बतच गट ,सर्व मिळून महिन्यातून एक वेळ संपूर्ण गावाची स्वच्छता करत राहू असे त्यांनी बोलण्यात सांगितले  या पार पडलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी बचत गटाच्या महिला युवक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बडवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सिडाम यांनी केले आणि हा कार्यक्रम इथे पार पडला.