
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वरोरा (जि.चंद्रपूर) येथील कवि जितेश अशोक कायरकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण यांनी वरोरा तालुका(जि.चंद्रपूर)अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
कवि जितेश कायरकर यांनी साहित्य क्षेत्रातील वंचित,तडागाडातील कवी,लेखक,साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक विचारपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील कवी,कलावंत यांना दिले आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे,विदर्भ विभागीय सचिव प्रा.मिलिंद रंगारी,नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,नागपूर विभागीय सदस्या कवयित्री सरिता रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम,कवी विशाल मोहूर्ले, कवयित्री सोनाली रायपुरे(शहारे), किशोर चलाख,दुशांत निमकर,महेश भामरे आदींनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
लोकहीत महाराष्ट्र वरोरा च्या group ला जॉईन करा.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
