लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटायला जात असताना प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या घटनेचा वणी शहर काँग्रेस तर्फे निषेध

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी तिकुनिया येथील शेतकरी बांधव आंदोलन करत असतांना केंद्रीय गृहमंत्री अमितशहाचे सहकारी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांना शांतीपूर्ण मार्गाने काळे झेंडे दाखवत असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी शेतकर्‍यांच्या अंगावर आपली गाडी घालून 4 शेतकऱ्यांना त्याच्या गाडीखाली चिरडले, ही घटना घडल्याने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीजी त्या पीडित शेतकरी परिवारास भेटायला जाण्यास निघाल्यावर त्यांना विना वारंन्ट असंवैधानिक अटक करून लोकशाहीची हत्या केली! त्याच्या निषेधार्थ आज दिनांक 06/10/2021 रोज बुधवार रोजी वणी तालुका काँग्रेस कमेटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवून मा. महामहीम राष्ट्रपति यांना उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देवुन निषेध नोंदविण्यात आला यावेळी उपस्थित वणी तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ वासेकर, वणी शहर प्रमुख प्रमोद भाऊ निकुरे, जिल्हा उपाध्यक्ष ईजहार भाई शेख, युवक काँग्रेस वणी विधानसभा अध्यक्ष संतोष भाऊ पारखी, शहर सेवादल अध्यक्ष प्रमोद भाऊ लोनारे, राजाभाऊ पाथ्रडकर, तालुका उपाध्यक्ष विकेश पानघाटे,मिडीया प्रसिध्दी प्रमुख प्रदीप खेकारे, सुधीर खंडाळकर, लक्ष्मण भाऊ पोन्नलवार, अक्षय धावंजेवार, सुरेश भाऊ बनसोड, अलताफ रंगरेज, गुलाम रंगरेज व असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.