शेगाव (खुर्द) येथे दोन्ही अपक्ष महिला विजयी

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी

ग्रामपंचायत निवडणूक २०२१ महाडोळी ग्रामपंचायत मध्ये धुरंधर राजकारण्यांकडून एकमेकाविरोधात दोन पॕनल उभे केलेले होते. परंतु शेगांव खुर्द वार्ड क्र.२ मधून सर्व पॕनल ला टक्कर देत दोन्ही अपक्ष महिला
कु.प्रतिभा शालिक मांडवकर ,इ.मा.महीला प्रवर्ग व सौ.माया प्रकाश मांडवकर सर्वसाधारण महिला प्रवर्गा मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे शेगांव खुर्द येथे आज दिवसभर आनंदोत्सवाचे वातावरण होते. दोन्ही विजयी उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी आतुरलेले पाहवयास मिळत होते.
याप्रसंगी दोन्ही उमेदवारांनी गावकऱ्याचे मनोमन आभार व्यक्त करुन आशिर्वाद घेतले.

शालीक मांडवकर यांनीही आपल्या मुलीला विजयी केल्याबद्धल गावकऱ्यांचे ऋण व्यक्त केले तथा प्रकाश मांडवकर यांनीही आपल्या पत्नीला विजयी केल्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे आभार मानले.