

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मनसे वरोरा तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवन चौक येथील प्रवासी निवारा बांधून या ठिकाणाहून नागपूर मार्गाने जाणाऱ्या प्रवासी, शालेय विद्यार्थी तसेच वयोवृद्ध यांना सावली देण्याचे काम केले होते.
दोन तीन महिन्या आधी एका अपघातात प्रवासी निवारा तुटला .त्यामुळे या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या प्रवाश्यांना याचा विशेष फटका बसला होता.शालेय विद्यार्थी, प्रवासी ,वयोवृद्ध यांना भर उन्हात बस ची वाट पाहावी लागत होती.ही समस्या लक्षात येताच मनसे सचिव प्रशांत बदकी यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारा बांधून देण्याचे ठरवले.8 मार्च च्या सायंकाळी चा प्रवासी निवारा तयार करून मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.अखेर मनसे च्या अभिनव आंदोलनाची दखल घेत पक्का प्रवासी निवारा बांधून देण्यात आला.प्रवासी निवारा तयार झाल्याचे कळताच मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी समाधान व्यक्त करत पुढेही सामान्य जनतेच्या सेवेत राहू असे सांगितले.यावेळेस तालुकाध्यक्ष वैभव डहाने,तालुका सचिव प्रशांत बदकी,कल्पक ढोरे,सचिन मांडवकर, रवी रंगारी,रोहन चिडे,दिनेश मसाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
