
वर्धा:-महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत .यात आता आणखी विलंब करू नका .पुढील दोन आठवड्याच्या आत निवडणूका जाहीर करा अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.याच्याआधीही न्यायालयाने पाऊस कमी असलेल्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सांगितलं होतं.सर्वोच्च न्यायालयाने आज बांठीया आयोगाचा अहवाल स्वीकारून आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका दोन आठवड्यात जाहीर करा असा निकाल दिल्याने ओबीसी समाजाला समाधान मिळाला आहे अशी प्रतिक्रिया ओबीसीचे नेते तथा जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष पियुष रेवतकर यांनी ट्विट करून दिली. महाविकास आघाडी व त्यातत्या त्यात अनेक ओबीसी संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे हे आरक्षण मिळविण्यात यश आले.मात्र बांठीया आयोगाने अहवालात ओबीसींची लोकसंख्या फक्त 37 टक्केच दाखविली हे न पटण्यासारखे आहे.म्हणून ओबीसी चळवळीच्या माध्यमातून ओबीसींची जनगणना व्हावी व ओबीसींवर होणारा अन्याय दूर व्हावा ही अपेक्षा आहे तसेच केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे राज्य व केंद्र सरकारने ओबीसींच्या न्याय व संवैधानिक मागण्या मान्य करून ओबीसींना न्याय द्यावा व सोबतच ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी कायमच आहे असे मत पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .
