पोंभुर्णा नगरपंचायत नगरसेवकांनी स्वखर्चातून केली प्रभागात धूर फवारणी,सतत नगरप्रशासनाला मागणी करुन ही होत होते दुर्लक्ष

पोंभूर्णा प्रतिनिधी:-आशिष नैताम

पोंभुर्णा शहरातील अनेक प्रभागात डासामुळे बेजार झालेल्या नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील नगरसेवक आशिष कावटवार,अतुल वाकडे व अभिषेक बद्दलवार यांनी केला. सतत पाऊस पडत असल्याने डासामुळे अनेक आजारांनी डोके वर काढले असताना नगर पंचायत मधिल सर्वसाधारण सभेत शहरात धुर फवारणी करण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. परंतू नगरप्रशासन या गंभीर आरोग्य विषयाकडे दुर्लक्ष करित वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत.त्यामूळे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे व अभिषेक बद्दलवार यांनी नगर पंचायत स्व:ता करु शकत नसेल तर फॉगिंग मशीन भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले व वारंवार मागणीची दखल न घेतल्याने नगरसेवकांनी आपल्या स्वखर्चाने आपापल्या प्रभागातील प्रत्येक गल्लीत धूर फवारणी करण्याचा संकल्प या तिन नगरसेवकांनी केला.
‘माझा प्रभाग , माझी सामाजिक जबाबदारी’तुन केलेल्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. पावसाचे दिवस यातच डासांचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात आजाराने चांगलेच डोके वर काढले होते. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना नगर पंचायत मध्ये चार फॉगिंग यंत्र धुळ खात पडून आहेत. लवकरात लवकर संपुर्ण पोंभुर्णा शहरात फवारणी करावी अशी ह्या नगरसेवकांनी मागणी केली आहे…।