
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील क्रांती चौक हा राळेगाव येथील हृदय स्थान म्हणून ओळखला जातो राळेगाव ही तालुक्याची पेठ असल्यामुळे राळेगाव तालुक्यातील अनेक गावची मंडळी शासकीय कामासाठी बँकेच्या कामासाठी राळेगाव नेहमीच ये जा करतात त्यामुळे या राळेगाव येथील क्रांती चौकात नेहमीच वर्दळ असते.
आज दिनांक 23.7.2022 रोजी राळेगाव येथील क्रांती चौकात नगरपंचायत यांनी कर्मचारी शौचालय व मुत्री घराची घराची साफसफाई करताना युद्धपात्री वर दिसले.संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता स्वच्छ सर्वेक्षणासाठी एक टीम येणारअसून त्यासाठीच साफसफाई व मुत्री घराची स्वच्छता सुरू असल्याची माहिती मिळाली.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी रायगाव येथील क्रांती चौकात दिसलेले साफसफाईने तसेच गेटवर दोन झाडाच्या कुंड्या… हात पुसायला नेपकिन, कचरा टाकायला दस्ट बीन.. साबण.. बकेट ,कचराकुंडी इत्यादी साहित्य दिसून आले. एरवी नाक तोंडावर रुमाल ठेवून मुत्री घरात जावे लागत होते शौचालयात तर काही सोई नव्हती पण आज सजवलेल्या या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मुळे ज्या सोयी पाहायला मिळाल्या ते पाहून सामान्य नागरिक मात्र अचंबित झाल्याचे चित्र दिसत होते.
गेल्या कित्येक दिवसापासून राळेगावातील क्रांती चौका त ट्रीट लाईट बंद असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अंधारातून जावे लागते अनेक वेळा सांगूनही चौकातला स्टेट लाईट लावला नाही पण आज मात्र त्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे मुत्री घरासमोर दिवसभर लाईट सुरु होता हे विशेष!
एकूणच स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणाऱ्या टीमला हा ताम जाम बरा जरी वाटला तरी येणाऱ्या काळात अशी सुविधा राळेगाव नगरपंचायत कार्यालयाकडून जर सामान्य जनतेला मिळाली तर बरे होईल असा सूर प्रत्येकाच्या तोंडून सामान्य जनतेतून निघत होता. या टीमचे सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर मात्र राळेगाव नगरपंचायत च्या कर्मचारी हे सर्व साहित्य अवघ्या दोन तासाच्या आत उचलून नेले .
