के.बी. एच. विद्यालय पवन नगर येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी माता-भगिनी यांचा सत्कार… महात्मा गांधी

विद्यामंदिर कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर येथे विशाखा समितीच्या अंतर्गत आणि महिला कल्याण व महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा मा श्रीमती संपदादीदी हिरे साहेब यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका युगंधरा देशमुख यांच्या नियोजनानुसार विद्यालयात दि 09 ऑगस्ट 2022, मंगळवार रोजी “जागतिक आदिवासी दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विद्यालयात आदिवासी समाजाचे विविध क्षेत्रात प्रगती केलेले बांधव, माता-भगिनी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांचा सन्मानाने सत्कार करून त्यांच्या हस्ते महामहिम राष्ट्रपती मा श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे आयोजन करण्यात आले आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला प्रमुख पाहुणे व अधिकारी यांनी सरस्वती पूजन केले.सौ अवंती चौरे,वैशाली केत्रे, वैशाली बागुल सोनी साबळे या आदिवासी भगिनी उपस्थित होत्या. सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रास्ताविक सौ पाटील आर. यु.मॅडम यांनी करून दिला. तसेच विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका सौ युगंधरा देशमुख यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी जीवन व संस्कृती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख वक्त्या वैशाली केत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रपती द्रौपदी मुर्म आमचे प्रतिनिधित्व करीत आहेत अशी भावना व्यक्त केली.

जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी विद्यालयातील समितीच्या सदस्या सौ जाधव डी.जे. सौ पाटील वाय. बी. सौ पाटील एस.एम. व सौ पाटील आर. यु. तसेच पर्यवेक्षक यु.बी देवरे उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ आर.यु पाटील यांनी केले. व आभार सौ एस एम पाटील यांनी मानले