
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जागतिक आदिवासी अस्मिता दिना निमित्त राळेगाव तालुक्यांत ठीक ठिकाणी वाऱ्हा, जळका, कोपरी, या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने आदिवासी समाजातील क्रांतिकारी महापुरुष विरांगणा राणी दुर्गावती,विर बाबुराव शेडमाके, रॉबिन हूड शामा दादा कोलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रामुख्याने मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.बळवंतराव मडावी साहेब राज्य कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा.विठ्ठलराव धुर्वे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांनी सहभाग नोंदविला आणि समाजातील लोकांना मार्गदर्शन केले आहे वाऱ्हा येथे मिरवणूक काढुण रॅली चे नेतृत्व रेखाताई कुमरे, अलका ताई तोडासे सुषमा मेश्राम,दुर्गा पुरके सुषमा पुरके देविदास वाढवे महादेव ऊईके, रुपाली मडावी वेणुताई शेडमाके अर्चना मेश्राम लता मेश्राम दिगांबर मेश्राम जळका येथिल गजानन सराटे , शाखा प्रमुख गोंडवाना गणतंत्र पार्टी महेश शेडमाके स्वप्निल मडावी गोपाळ सराटे मारोतराव मडावी नारायण मडावी दिनेश आत्राम सदाशिव टेकाम रामभाऊ पुरके मनमोहन हिवरकर सुशिला तुमराम माया वरकडे संगिता आत्राम सिता मडावी कोपरी येथे विनोद भाऊ पराते तानाबाई येलके कांताबाई मडावी आणि तरुण युवकांनी पुढाकार घेऊन जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
