
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले तसेच अनेक गावात पाणी शिरल्यामुळे घराची पडझड होऊन घरातील अन्नधान्य सह घरातील वस्तू सुद्धा खराब झाल्या आहे. या पुरग्रस्थाना ला “एक हात मदतीचा” द्यावा म्हणून #रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने चहांद व लाडकी या गावांमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी 300 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सदर रेशन किट ही रिलायन्स फाउंडेशन मार्फत देण्यात आले. त्यावेळी गावातील सरपंच सौ. रूपाली शंकर राऊत, श्री संजय झिलपे ग्रामसेवक तसेच निखिल शेळके ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे उत्कृष्टरित्या पार पडले.
