

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 ऑगस्ट रोजी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात रांगोळी ,निबंध व कायम स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा जयंतराव यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली
हु. ज.पा. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ. सविता बोंढारे ,सहाय्यक प्रा.डॉ.कृष्णानंद पाटील यांनी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटना, क्रांतिकारक ,हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेली आहुती व राष्ट्रपुरुषाचे बलिदान सांगितले व विविध रांगोळ्या काढल्या यावेळी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. लक्ष्मण पवार मराठी विभाग प्रमुख व प्रा. डॉ. शिवाजी भदर्गे हिंदी विभाग प्रमुख हे होते यांनी यांच्या परीक्षा नंतर उपस्थित सहभागी विद्यार्थांन मधून प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक जाहीर करून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी ह्या वकृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
