हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील 35 लाख रुपयांच्या भक्त निवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आली असून त्याचा लवकरच शुभारंभ सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे असे शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांनी सांगितले
तालुक्यात प्रसिद्ध व जागरूक असलेल्या मौजे बोरगडी येथील हनुमान मंदिर भक्तनिवासाच्या बांधकामासाठी मागील काळात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी 35 लाख रुपयांचा निधी दिला होता त्या सभागृहांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून त्याच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण होत आहे त्याचा शुभारंभ सोहळा लवकरच माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार आहे माजी आमदार नागेश पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात आमदार असताना तालुक्यातील अनेक गावांतील मोठ मोठ्या सभागृहा साठी निधी दिला तर काही ठिकाणी पिव्हर ब्लॉ कचे रस्ते असे अनेक कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे केली या वेळेस तर राज्याचे मुख्मंत्री शिवसेने चे आहेत आता आमदार नसून सुद्धा त्यांनी आपल्या मतदार संघासाठी विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे त्यांनी सांगितले त्यामुळे तालुक्यातील मौजे बोरगडी येथील भक्त निवास सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे लवकरच माजी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते या भक्त निवासाच्या सभागृहाचा शुभारंभ सोहळा होणार आहे असे बोरगडी येथील ग्रामस्थांनी सांगितले