
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यावर्षीच्या शेतीहंगामात यवतमाळ जिल्ह्यात झालेली अतिपाऊस व धगफुटीमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली. याला कंटाळून राळेगाव येथील युवा शेतकरी सुभाष वसंतराव अवतारे यांनी दिनांक १८/८/२०२२ ला पहाटे इंदिरा नगर राळेगाव येथे राहत्या घरी फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. त्याचाकडे सिलिंग ची तीन एकर शेती असून, शेती कर्ज सुध्दा आहे.
त्याच्या मागे म्हातारे आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन मुली सह बराच मोठा परिवार आहे.
अतिवृष्टीमुळे राळेगांव तालुक्यात झालेली ही पाचवी शेतकरी आत्महत्या आहे हे विदारक सत्य आहे..
