
हिमायतनगर प्रतिनिधी
जवळगाव केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सन 2021-22 मधील या परीक्षेचा निकाल 11 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेमध्ये जि.प.हायस्कुल जवळगाव ता.हिमायतनगर शाळेचे 17 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
आश्लेषा अरविंद पवार,मनिषा राजेश गायकवाड,मुक्ताई गजानन गायकवाड,प्रतिज्ञा अशोकराव रावते,गायत्री बाबाराव कुंभेकर,
कादंबरी संतोष बाकोटकर, निकिता तानाजीराव कदम, आरती भिमराव पवार,अंबिका संतोष पवार,सुमित माधव इंगोले हे विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा देता येते. एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला आठवी ते बारावीपर्यंत वर्षाला 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
या विद्यार्थ्यांना विषयशिक्षक चंद्रकांत कदम,वसंत गोवंदे,रमेश माळगे,वैजनाथ चेपूरवार,महेश पडगीलवार,संगमनाथ मुंडकर, श्रीमती सुरेखा कमळू,श्रीमती सारिका येरमवार,श्रीमती सुरेखा गुरुफळे, श्रीमती वंदना ढोकाडे,श्रीमती वैशाली मुस्कावाड यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.बी.शिराळे, माजी मुख्याध्यापक डी.एस.झांबरे,बी.एस.गोडाजी,
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
