परसोडा येथे कृषी महाविद्यालयाच्या वतीने गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.


प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा


पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समितीद्वारा स्थापित आनंदनिकेतन कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा येथे गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा केला.गाजर गवताविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने गााजर गवत निर्मूलन सप्ताह १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान आयोजीत करण्यात आला होता . विद्यार्थीनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना गाजर गवतपासून होणारे दुष्परिणाम, त्वचारोग, आणि गाजर गवत नियंत्रणाचे उपाय सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये प्राजक्ता हटीटेल, काजल कापगते, प्रतिष्ठा खाडे, पुजा कड, ऋतुजा गिरी, श्रुतिका खेकडे आणि वैष्णवी हनवते या कृषीकण्यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. सुहास पोतदार सर,कार्यक्रम समन्यक डॉ. स्वप्नील पंचभाई सर ,ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन सर , डॉ.प्रदीप अकोटर , डॉ. सतीश इमडे सर , डॉ. मुकुंद पतोंड सर यांचे मार्गदर्शन लाभले.