लाडक्या सर्जा राजाच्या सणासाठी उसनवारी करून बळीराजा बाजारात


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


श्रावण महिन्याच्या अमावस्येला येणारा सण म्हणजे पोळा बळीराजा आपल्या जिवाभावाचे सोबत्या सोबत हा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात पूर्वापार चालत आलेला पोळा या सणाचे महत्त्व आजही कायम टिकून आहे या सणासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे . जुलै ऑगष्ट या महिन्यात सतत पडलेल्या पावसाने खरीप पिकावर अतोनात खर्च झाला असताना पावसामुळे शेतातील पिके सर्वत्र नेस्तनाबूत झाली अशातच आलेला पोळ्या सणाला समोर जावेच लागणार हाती पैसा नसताना कुठे पदर मोड तर कुठे उसनवारी करून लाडक्या सर्जा राजाला पोळ्या निमित्त सजविण्यासाठी बळीराजाची बैलाच्या साज सजावटी साठी लगबग सुरू आहे.
उद्या असलेल्या पोळा सण हा भारतीय संस्कृतीत वृक्ष प्रमाणे वन्य जीवांना देखील पूजनीय मानले जाते शेतकऱ्यांसमवेत राबवणाऱ्या बैलांप्रति एक दिवस ऋण फेडण्याची संधी म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते त्या दिवशी बैलांना आंघोळ घालून त्याच्या शिंगांना रंग लावला जातो बारशिंग बांधले जाते गळ्यात कवड्याची घुंगराची माळ घातली जाते या सर्व बैलाला सजावटीच्या साहित्याच्या किमती ३० ते ४० टक्याने वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले असले तरी दोन वर्षांपासून कोरोना आजारामुळे पोळा सणावार मर्यादा होती त्यामुळे पोळा सण दोन वर्षे पाहिजे तसा साजरा करता आला नसल्याने यावर्षी तरी मात्र पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा असे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे त्यासाठी बळीराजाची यंदा पोळा सणाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.