रामराव गायकवाड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शालेय साहित्य वाटप


प्रतिनिधी::प्रवीण
ढाणकी


शहरातील सामाजीक राजकीय नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोलीस पाटील रमण रावते यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपसरपंच प्रदीप मिटकरे, छबुराव धोपटे, किशोर ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती सभापती अनिल गायकवाड यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जवळेकर मॅडम यांनी केले
यावेळी रामराव गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळे विषयी मनोगत व्यक्त करतांना सरकार जिल्हापरिषद शाळे मधील विध्यार्थ्यांना शालेय ड्रेस शालेय पुस्तक दुपारचं भोजन विनामूल्य शिक्षण देऊनही आज पालक वर्ग जिल्हा परिषदे कडे पाठ फिरवताना दिसत आहे
इंग्लिश संस्कृती च्या मोहजाळात अडकून अगदी निरागस पाल्यावर वर्षा काठी लाखो रुपये विनाकारण खर्च करतो आहे
आज जिल्हा परिषद शाळा जर वाचवायची असेल तर प्रत्येक पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावी भविष्यात पुन्हा मराठी माध्यमाचे दिवस येणार त्यामुळे कदाचित आपल्याला जिल्हा परिषद शाळा उपलब्ध राहणार नाही
इंग्लिश मध्ये जे शिक्षण विध्यार्थ्यांना दिल्या जाते तेच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाते मग फक्त स्वतः च्या प्रतिष्ठे करीता आज लाखो रुपये खर्च केल्या जात आहे असे सांगून जिल्हा परिषद व मराठी माध्यमाच्या शाळा हेच पुढील भविष्य असणार असे यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले