सर्वत्र गाजतंय ढाणकीच्या युवकाचं श्री गणेश गीत,उमरखेड येथील दहीहंडी मध्ये नेत्यांच्या हस्ते लोकार्पण

ढाणकी/प्रतिनिधी :प्रवीण जोशी

विविध पातळीवर ढाणकी शहराचं नावलौकिक असून, संगीत क्षेत्रातही ढाणकी मागे नसल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. ढाणकी येथील युवा तरुण सुनील मांजरे यांनी नुकतेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेशाचे गीत बनविले असून, काल उमरखेड येथे झालेल्या भव्य दहीहंडी च्या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या हस्ते या गीताचे लोकार्पण होऊन, हे गीत तेथे डीजेवर वाजविण्यात आले. उपस्थित लोकांनी या गीतावर ठेका धरला. उमरखेड तालुक्यातील ढाणकी सारख्या ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रकारचं गीत निर्माण होणे हे निश्चितच ढाणकीकरांसाठी अभिमानाची बाब असून, ग्रामीण भागातील कलावंत सुद्धा कुठेच मागे नाही यावरून सिद्ध होते.सध्या हे गीत ढाणकी व परिसरात भरपूर प्रसिद्ध झाले असून जिकडे तिकडे हेच गाणे वाजताना दिसत आहे. सुनील मांजरे यांचं संगीतात एम.ए. पर्यंत शिक्षण झाले असून ते शहरात संगीताचे क्लास घेतात व तसेच स्वरराज संगीत संचाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करीत असतात. त्यांनी श्री गणेशाचे हे गीत स्वतः लिहून, स्वतः संगीतबद्ध करून गायले असून, हे गीत ‘मोरया श्री विनायका’ या टायटल द्वारे युट्युब वरील ‘Sunil Manjare Swar Raj Orchestra’ या चॅनेलवर सर्वांना पाहायला व ऐकायला मिळेल. आणि या वर्षीच्या गणेशोत्सवात हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात डीजेवर धमाल करेल. अशा प्रकारचे हे गीत असून सर्वांनी आवश्यक हे गीत त्यांच्या चॅनलवर जाऊन पहावे, ऐकावे असे आवाहन त्यांनी केले आहे.