
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
काल मटका पकडून राळेगाव शहरात पोलीस कर्तव्यावर असल्याचे दिसून आले लगेच आज पुन्हा अवैध सुरू असलेला मटका पकडून आपली जबाबदारी पूर्ण करताना राळेगाव पोलिस स्टेशन दिसून येत आहे, आज मा.पो.नी.संजय चोबे साहेब यांचे आदेशाने दी.03/09/2022 रोजी आम्ही पो.उप.निरीक्षक मोहन पाटील, पो.हे.काँ गोपाल वास्टर ,ना.पो.काँ सुरज चिवाने, असे गणेश ऊत्सव संबधाने राळेगांव शहरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन खबर मिळाली की नगरपंचायत चे गाळया मागे आठवडी बाजारात सार्वजनीक ठिकाणी नामे अतुल धनुर्धर भगत वय 39 वर्ष रा.भिमनगर राळेगांव हा लोकांन कडुन पैसै घेवुन त्यांना वरळी मटका आकडे लीहीलेल्या चिठ्या देवुन पैसै हारजितचा खेळ खेळतांना मिळुन आला त्याचे अंगझङतीमध्ये वरळी मटका साहित्य व नगदी 1120/- रु.व एक मोबाईल असा ऐकुण 6140 रु.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला सदर मटकाचा मालक ईम्राण अजीज कुरेशी रा.राळेगांव हाअसल्ल्याचे आरोपीने सांगीतले वरुन दोन्ही आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही मा.पो.नी.साहेब यांचे मार्गदर्शनात करण्यात आली असून राळेगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेला जुगार ,मटका व अवैध वाहतूक यांच्याकडे आपले लक्ष केंद्रित करतील का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे तरी आपली कर्तव्यदक्ष पणा दाखवत शहरात व खेड्यापाड्याील सुरू असलेले अवैध धंदे कोणाच्या कृपेने चालतात यावर आवर घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
