

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर येथील नामांकित असेलेले कॉलेज हुतात्मा जवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व राजा भगीरथ विद्यालय येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध शाळेतील शिक्षकांचा विद्यालयात जाऊन सन्मान पत्र देऊन सन्मामिन करण्यात आले.
हिमायतनगर परिसरातील सर्व शिक्षक हे विद्या द्यान देण्याचे पवित्रकार्य करीत असतात,त्यासाठी करीत असलेले प्रयत्न खरोखरच आभिमानस्पद आहे. या त्यांच्या कार्यामुळे शिक्षक दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील भाग्योदय कॉम्पुटर सेंटर चे संचालक विनोद सुरेशराव चंदनवार व परम कॉम्पुटर चे संचालक गंगाधर मिराशे यांनी शिक्षकांना सन्मानित करून एक सामाजिक बांधिलकी जपत ही आगळी वेगळी कल्पना साकारली ,या कल्पनेची सर्व शिक्षक वर्गातून कौतुक केलं जातं आहे.
