लाखो रुपये खर्च करून लावलेले हायमाईस्ट बनले शोभेचे वस्तू

प्रतिनिधी
प्रवीण जोशी /ढाणकी


सध्या नवरात्र उत्सव अगदी जवळ आला असताना गावातील बंद अवस्थेत असलेले पथदिवे बसविण्यास जरी सुरुवात झाली असली तरी कमी विद्युत मध्ये लख्ख प्रकाश देणाऱ्या अशा हायमाईट लाईट कडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे तेव्हा ते चालू झाल्यास अधिक उत्तम होऊन येणाऱ्या नवरात्र उत्सव अगदी प्रकाशात झोतात साजरा होईल.
ढाणकी शहरातील नगरपंचायत अंतर्गत निधीतून गावात शहरात ठिकाणी मोठे हायमाईस्ट लाईट लावण्यात आले लावल्या नंतर लाईट फक्त काहिदिवस नियमित चालू होते मात्र गेल्या अनेक महीण्यापासून उपलब्ध असलेल्या एकही हायमाईस्ट लाईट चालू नाही हायमाईस्ट लाईट बंद असल्याबाबत नगरपंचायतला प्रशासनाला माहिती असायला पाहिजे या बाबत सविस्तर माहिती घेऊन या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे द्यायला पाहिजे . नगरपंचायत ने हायमाईस्ट लाईट दुरस्ती कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये खर्च करून लावलेले हायमाईस्ट लाईट फक्त शोभेसाठी लावले का असा सुर जनतेतून एेकायला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसातच नवरात्र महोत्सव ला सुरवात होणार आहे अनेक भाविक भक्त रात्रीच्या सुमारास आरती साठी येत असतात हायमाईस्ट लाईट बंद असल्यामुळे नवरात्र काळात अंधाराचा सामना करावा लागेल नवरात्र उत्सवात तरी हायमाईस्ट लाईट नगरपंचायत दुरस्ती करेल का? हे पाहणे गरजेचे आहे.