अ.भा.अंनिसची आर्वी विभागस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारला,प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे देणार प्रशिक्षण .

आर्वी:- अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जादूटोणा विरोधी कायद्या विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने, कारंजा (घा.) येथे दि.२४ सप्टेंबर शनिवार रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा कारंजा (घा.), जिल्हा वर्धा द्वारे कारंजा (घा.), आष्टी, आर्वी या तीन तालुक्यांतील इच्छुक स्त्री – पुरुष, युवांचे आर्वी विभाग स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात भूत, देवी अंगात येणे, आत्मा , गुप्तधन, भानामती, संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, जादूटोणा, करणी, चकवा , जादुटोणा विरोधी कायदा, चमत्कार प्रात्यक्षिकांसह अनेक विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. दि. २४ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी कारंजा शहरातील नारायणराव काळे स्मृती मॉडेल कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दुपारी १२:३० वाजता या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध वक्ते तथा अ.भा. अंनिस युवा शाखा महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे असणार आहे. या कार्यशाळेत सविता भांडवलकर , प्रा. डॉ.उमेश मेश्राम, राजकुमार तिरभाने, अनिता शेटे , मंदा नागले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. वेळेवर सुरू होणार असलेल्या या कार्यशाळेत कारंजा , आष्टी , आर्वी तालुक्यातीत जास्तीत जास्त संखेत महिला व पुरुषांनी, युवांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन अ. भा. अंनिस वर्धा जिल्हा अध्यक्ष हरिश इथापे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाणे , जिल्हा सहसंघटक प्रशांत नेपटे , जिल्हा महिला शाखा संघटक डाॅ. सुचिता ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. धनंजय सोनटक्के, आष्टी ता. संघटक राहुल गजरे, आर्वी ता. संघटक सागर शिंगणे, सुनीता जाने, कारंजा ता. संघटक , राजकुमार तिरभाने, पियूष रेवतकर, उमेश पाचपोहर, विनोद दंडारे, संगीता पाटील, अंजली इंगळे, बबिता शेंडे यांनी केले आहे.