अक्षय थुटे यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश!

देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात व कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार, किशोरची दिघे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते अक्षय भास्कर थुटे यांनी सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.
अक्षय थुटे हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ते वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विधानसभा अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह इतर सामाजिक कार्यात देखील ते सक्रिय आहेत. covid-19 च्या काळात रुग्णांना थेट रुग्णालयात जाऊन रक्तदान, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके गणवेश वाटप यांसारख्या अनेक कार्यातून त्यांनी हिंगणघाट शहरासह ग्रामीण भागात सुद्धा आपली पकड मजबूत केली. युवा सुशिक्षित शांत संयमी स्वभाव असल्याने सगळ्याच राजकीय पक्षात त्यांचे हितचिंतक आहे, याचाच फायदा आगामी काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यात होईल यात शंका नाही.
अक्षय थुटे यांच्यासह अमर मेसरे, सचिन महाजन, तुषार मांडवकर, शुभम मांडवकर, अनुप भंडारे, पियुष डांगे, हर्षल जिकार, साहिल उमाटे, अंकित कोल्हे, ऋषीकेश उमाटे आदिनी पक्ष प्रवेश केला. यां प्रसंगी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भाजपा तसेच भाजयुमो चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.