
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
मारेगाव तालुक्यातील गोटमार बोरी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस वाढोणावरून आरोपींनी गोटमार बोरी येथे बळजबरीने घरी पळवून नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी पीडित मुलीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडकी पोलीस ठाण्यात आरोपी पवन पुरुषोत्तम गेडाम (२२) (रा.गोटमार बोरी, ता.मारेगाव) व किशोर दिलीप मन्ने (२५) (रा.रोहिणी, ता. राळेगाव) यांना अटक करून यासह इतर तीन महिला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे दिनांक १४ सप्टेंबर रोजी वाढोणा येथे कॉलेज जात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एक वाढोणा येथील ओळखीच्या महीलेनी कॉलेजकडे जात असताना घरी बोलविले व तिला घरीच डांबून ठेवले. त्यांनंतर तिला तीन महिलांनी वाहनांमध्ये टाकून गोटमार बोरी येथे घेऊन गेले. वाहनात नेत असताना त्या महिलांनी मुलगी अल्पवयीन व लग्न झाले नसल्याने अधिक पैसे मिळेल अशी त्या तीन महिलांची चर्चा सुरू होती. त्यांनतर गोटमार बोरी येथील एका घरातील अंधाऱ्या कोठारी मध्ये चार दिवस डांबून ठेवले व तिच्यासोबत दोन आरोपींनी बळजबरीने अत्याचार केला. यानंतर दिनांक १८ सप्टेंबर रोजी पाच वाजताच्या सुमारास वडकी येथे मुलगी आढळून आली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या माहितनुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहे.
राळेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलेच्या सुरक्षिततेवर प्रशचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाचे लक्ष कुठे आहे, नराधमांना शिक्षा होत नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
