
प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी…..
ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव येथील विजय पुंजाराम वाडेकर या तरुणास तसा लहानपणापासूनच फुले आणि इतर निसर्गाशी निगडित बाबींशी आवड जोपासत असतो. व आपल्या बागेत निरनिराळे प्रयोग करत असतो काही वर्षांपूर्वी त्याने ब्रह्मकमळ याची लागवड केली. सहसा आपल्याला सहजपणे ब्रह्मकमळ कुठे आढळत नाही. अत्यंत मोहक पांढरे शुभ्र आणि सुगंधित असणारे मनमोहक फुल पाहण्याची इच्छा सर्वांची असते. गांजेगाव येथील विजय वाडेकर याचे घरी हा दुर्मिळ योग बघावयास गांजेगावकरांना मिळाला.
ब्रह्मकमळ उमलल्यामुळे सभोवतालचा परिसर सुगंधाने नाहून निघाला आणि ही नैसर्गिक लीला बघण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा होत आहे. विजू वाडेकर यांनी आपल्या खुल्या जागेवर अनेक फुलझाडे व फळझाडे याची प्रचंड प्रमाणात लागवड सुद्धा केली त्यात त्यांना आवड असल्यामुळे ते विविध प्रयोग राबवत असतात. ब्रह्मकमळ हे एक निवडुंगाचा एक प्रकार असून याची पान खोडात परिवर्तित होऊन आणि मग त्याचे रूपांतर कळ्यांमध्ये होते. व त्याचे नंतर फुलात रूपांतर होते. ब्रह्मकमळाचा पांढराशुभ्र बहुरंगी रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो हे फुल खूप नाजूक असते विविध रंगांच्या पाकळ्या मनमोहन टाकतात विजू पुंजाराम वाडेकर यांच्या योग्य नियोजनामुळे हा दुर्मिळ योग गांजेगावकरांना बघावयास मिळाला.
