
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
आज रोजी आरोग्य केंद्र राळेगाव येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत येत असलेल्या लाभार्थी यांना कोणताही त्रास होऊ नये या उदांत हेतू ने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. आणि त्यांचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळावा याकरिता जिल्ह्यातून तालुक्यातील आरोग्य केंद्र वर आज राळेगाव येथे कॅम्प घेण्यात आला.आधार कार्ड मध्ये असलेल्या त्रुटी त्या संपूर्ण दुरुस्त करून लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता व ऑनलाइन कोणताही त्रास नहोण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील लाभार्थ्यांना एकूण 34 लाभार्थ्यांनी आज रोजी मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्पचा लाभ घेतला हा कॅम्प आरोग्य केंद्र राळेगाव येथे संपन्न झाला.
