
ढाणकी.(प्रतिनिधी) प्रवीण जोशी
अहिल्यादेवी होळकर प्राथ. शाळा, बिटरगाव बु.प.स.उमरखेड येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून सर्व उपस्थित मुलींचे स्वागत करण्यात आले. मुलींना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि गुणवत्ता विकास होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच सर्व विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्र शासनच्या वतिने तथा आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सोंनदांभी प.स.उमरखेड जि.प. यवतमाळ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय जंत नियंत्रणाच्या गोळ्या तसेच राष्ट्रीय जंतनाशक दिन या निमित्य सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक संपूर्ण माहिती देण्यात आली.त्यामध्ये नेहमी सतत स्वच्छ हात धुवावे. सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.उघड्यावर स्वच्छास(संडासला) बसू नये.नखे स्वच्छ ठेवावी व वेळोवेळी नियमित कापावित.पायात बूट नेहमी घालावा,हातरूमालचा वापर नियमित करावा अशा प्रकारे आरोग्य विषयक संपुर्ण माहिती तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जंता पासून मुक्त सशक्त भविष्य आमचं हे अभियान राबवण्याकरिता आशा वर्कर्स संपूर्ण वैद्यकीय अधिकारी यांची श्रीमती डोंगे मॅडम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सोंदाबी यांचे सहकार्य लाभले वयोगट एक ते नऊ वर्षाच्या मुला मुलींच्या सर्वांना निशुल्क जंत नियंत्रण गोळ्या देण्यात आल्या व त्याचे फायदे विशद करण्यात आले या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिन व राष्ट्रीय जंतनाशक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाकरिता श्रीमती डोंगे मँडम वैद्यकीय अधिकारी,सामुदाय वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सेवक,गटप्रर्वतक,सर्वआशा आरोग्य कर्मचारी तथा शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद येल्हेकर,राजकुमार खंदारे(शिक्षक),श्रीमती सीमा गारशेटवाड(शिक्षिका), गजानन रामशेटवार व संपूर्ण पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
