साहेब ! गोर-गरीब मुलांच्या गणवेशाला पळवले हो कुणी… ( समग्रचा निधी अप्राप्त, शाळेची मुल वंचीत, महाराष्ट्र बँके जबाबदार ? )

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

क्र. 1)
महाराष्ट्र बँकेच्या अफलातून कारभाराचा महीमा वर्णावा किती शिक्षण क्षेत्रात काय सुरु आहे कळण्यास मार्ग नाही. एकीकडे शाळा बंद करा चे आदेश धडकत आहे तर दुसरीकडे मुलांना अजूनही गणवेशच मिळालेले नाही. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत येणारा गणवेश निधी आज दिवाळी तोंडावर आलेली असतांना देखील अनेक शाळेंना प्राप्त झालेला नाही. राळेगाव तालुक्यात अशा 11 शाळा आहे. महाराष्ट्र बँकेच्या अनागोंदी कारभाराचा यात सर्वाधिक वाटा असल्याची माहिती आहे
सन 2002 पासून सुरु झालेल्या समग्र शिक्षा अभियानातंर्गत या दोन दशकात पाच वेळा बँक बदलविण्यात आल्या. आता सहाव्यांदा ऐच डी एफ सी बँकेत खाते काढण्याचे आदेश येऊन धडकले. मात्र मूळ उद्देश सफल होण्याची चिन्ह नाही. गोर -गरिबांच्या मुलांना शालेय गणवेश वाटप ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येते. वास्तविक शाळा सुरु झाल्यावर जुन महिन्यातच गणवेश रक्कम शाळेला प्राप्त व्हायला हवी, यंदा मात्र ऑक्टोबर महिला लागला तरी अनेक शाळेना हा निधी मिळालाच नाही. जिल्ह्यात अशा अपात्र निधी असणाऱ्या शेकडो शाळा असून राळेगाव तालुक्यात तब्बल अर्धा डझन च्या आसपास शाळा आहे. यात महाराष्ट्र बँक उमरसरा येथे खाते असणाऱ्या सर्वाधिक शाळांचा समावेश यात आहे.
शालेय विध्यार्थ्यांना ओक्टोम्बर महिना उलटून देखील गणवेशच मिळाला नसेल तर त्या योजनेचा उपयोग काय असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील पालक वेक्त करतांना दिसतात. विशेष म्हणजे शासनाने हा निधी वळता केला मात्र तांत्रिक अडचणीचा खोडा घालून हा निधी अडवण्यात आला आहे.
एकीकडे पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याचे आदेश धडकत आहे. दुसरीकडे शालेय पोषण आहार, मदतनीस, शाळा अनुदान याची रक्कमच शाळेला देण्यात येतं नाही. मोठया पटसंख्या असणाऱ्या शाळांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसतो. याचा अर्थ कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करायच्या व अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळाना निधी अभावी दुबळे करून ठेवायचे. असा तुघलकी प्रकार सध्या शिक्षण क्षेत्रात सुरु आहे.स्टेट बँकेचे खाते बंद करून महाराष्ट्र बँकेत शाळेचे खाते उघडण्याचे निर्देश मागील वर्षी देण्यात आले. यात राळेगाव तालुक्यातील अनेक शिक्षकांनी उमरसरा शाखेत खाते उघडले. यंदा च्या चालू वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश निधी या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. या बाबत मुख्याध्यापक वारंवार महाराष्ट्र बँकेत चकरा मारत आहे. आधी चेकर -मेकर सिस्टीम ऍक्टिव्ह नाही, त्या नंतर व्याज जमा झाले ते परत झाल्यावर येईल. असे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता आम्ही मुंबई ला तक्रार पाठवल्याची सारवासारव महाराष्ट्र बँक करीत आहे. विशेष म्हणजे दरम्यान पुन्हा दुसऱ्या बँकेत खाते काढण्याचे आदेश येऊन धडकले आहे. आता हा निधी खरंच मिळणार की नाही याची खात्री नाही.

      

क्र 2 )
महाराष्ट्र बँक उमरसरा शाखेत ज्या शाळांचे खाते आहे. त्या शाळेच्या खात्यात गणवेश निधी जमा झालेला नाही. या बाबत शिक्षण विभागाच्या वतीने लेखी तक्रार बँक वेवस्थापना कडे करण्यात आली. वारंवार या बाबी चा पाठपुरावा करण्यात येतं आहे.
– शेख लुकमान
गट शिक्षणाधिकारी प. स. राळेगाव

क्र. 3)
‘ जि. प. गुजरी शाळेला अजूनही समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश निधी मिळालेला नाही. वेवस्थापन समिती ने हा निधी त्वरित मिळण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेतला. महाराष्ट्र बँक चा काहीतरी घोळ असल्याची माहिती आहे. बँकेचा हा प्रकार अन्यायकारक म्हणावा लागेल. गोर-गरिबांच्या मुलांना शासनाने निधी दिला तरी गणवेश मिळू नये ही गँभीर बाब मानली पाहिजे. या बाबत शिक्षण विभागाने त्वरित पाठपुरावा करून गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा करावा. आधीच खूप विलंब झाला निदान दिवाळी आधी तरी विध्यार्थ्यांना गणवेश मिळायला हवा.
– सोनाली लव्हाडे
अध्यक्ष शाळा वे. समिती गुजरी.