
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातली क्रांती चौक येथील बंडुजी वाघ यांच्या किराणा दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे व सोबत सुनील काळे यांचे LIC विम्याचे ऑफिस जळून खाक झाले असुन एक गोडाऊन जळाले. टँकरच्या माध्यमातून थोडी आग आटोक्यात आली त्यानंतर पोलिस विभागाने यवतमाळ येथील नगर परिषदेची अग्निशामक बोलावण्यात आली त्यानंतर आग आठोक्यात आली आजूबाजूने असलेली सर्व दुकाने खाली करण्यात आले होते या आगीमध्ये दुकानदारांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस विभागाने ठाणेदार व कर्मचारी उपस्थित होते.ही आग लागण्याचे कारण अद्याप पुढे आले नसले तरी व्यापाऱ्यांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
