
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी
माँ. भगवती क्रीडा मंडळ मेट स्व. नुरसिंग गारु राठोड यांच्या स्मरणार्थ सुरेश राठोड( नाईक) मित्र मंडळा तर्फे मेट येथे कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
ढाणकी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक अमोल तुपेकर, काँग्रेस व्यापारी तालुकाध्यक्ष रुपेश भंडारी, ढाणकी सोसायटी अध्यक्ष बंटी वाळके, जीनप्रेस संचालक बाबुराव नरवाडे, शिवाजी वैद्य, बिरजूलाल मुडे उपस्थित होते. इंटरनेट व मोबाईलमुळे सध्या मैदानी खेळाचे महत्व सर्वत्र कमी होतांना दिसून येत असतांना मात्र मेट येथे गेल्या अनेक वर्षा पासून कब्बडी खेळाचे आयोजन न चुकता दरवर्षी करण्यात येत असल्याने मेट गाव आजही मैदानी खेळाचे महत्व जपत असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटिल चंद्रे यांनी कब्बडी खेळाच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, रूपेश भंडारी, बाबुराव नरवाडे यांनी कबड्डी संघाला प्रोत्साहनपर बक्षीस दिले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राम राठोड, सुरेश राठोड नाईक, गुलाब चव्हाण, माजी सरपंच गणेश राठोड, प्रल्हाद राठोड, अरविंद राठोड, डॉक्टर चव्हाण, बाबूसिंग जाधव, भीवराव चव्हाण, उत्तम सवाई राठोड, विश्वनाथ राठोड, दिलीप जाधव, राजू गंगाराम, सुनील चव्हाण, दत्ता राठोड, विनोद राठोड, प्रकाश राठोड, जयदीप जाधव, बाळू राठोड, अरविंद राठोड, दिग्विजय राठोड, गजानन चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
