हरविलेले पॉकेट परत करत सूरज नैतामने जोपासली माणुसकी

तालुका प्रतिनिधी:- आशिष नैताम


पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकरचे रहिवाशी परंतु सध्या पोंभूर्णा येथे वास्तव्यास असलेले श्री. सूरज वामनराव नैताम हे नांदगाव येथील एका शासकिय आश्रम शाळेत प्रयोगशाळा सह्हायक या पदावर कार्यरत आहेत त्यांना पोंभूर्णा ते बोर्डा बोरकर या रस्त्यात एका अनोळखी व्यक्तीचे पॉकेट मिळाले पॉकेट उघडून पाहील्यावर त्यात संबंधीत व्यक्तीचे महत्वाचे कागदपत्रे व रोख रक्कम ४७००/- चार हजार सातशे रुपये दिसून आले सूरज नैताम यांच्या मनात स्वार्थ असता तर ते पॉकेट स्वतःस ठेऊन घेतले असते मात्र त्यांनी परीस्थीतीचा विचार करीत ज्यांच पॉकेट आहे तो किती अडचनीत असेल हा विचार करून पॉकेट मध्ये असलेल्या कागदपत्राच्या माध्यमातून संबंधीत व्यक्तीशी संपर्क करीत पॉकेट संबंधी शहानिशा करून तुम्हचं पॉकेट मला सापडलं असल्याचे सांगितले ते पॉकेट तुषार देवराव पाल मु. पिपरी देशपांडे ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर याचे होते त्याला पोंभूर्णा येथे आपल्या घरी बोलावून दिनांक ५/११/२०२२ ला त्याचे मूळ कागदपत्रे व पैसे परत केले सूरज नैतामनी मानूसकी जोपासत समाजापुढे एक आदर्ष ठेवल्याने सर्व स्तरावरून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे