
बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर असलेल्या पुलाला भलामोठा खड्डा पडल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत.ही घटना घडली तेव्हा रेल्वे रुळावर कोणतीही रेल्वे उभी नव्हती त्यामुळे जीवितहानी टळली. या सर्व घटनर्ला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमीच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.
दुर्घटना इतकी गंभीर होती की पुलावरून पडलेल्या प्रवाश्यांचा स्पर्श 2500 केव्ही लाईन च्या ताराला झाल्याने प्रवासी गंभीर रित्या भाजले आहेत.दुर्घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.जखमींची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

