घरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.

ढाणकी प्रतिनिधी.प्रवीण जोशी

ढाणकी पासून जवळच असलेल्या अकोली येथे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. व्यवसायाने इंजिनीयर असलेल्या 25 वर्षीय वैभवने राहत्या घरी घराच्या नाटीला दोरी लावून गळफास घेतला ही घटना 28 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजता उघडकीस आली.                                 

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, घटनेच्या दिवशी मृतकाचे आई-वडील व अन्य कुटुंबीय जवळच्या एका नातेवाईकाच्या लग्नात समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. आपल्या घराचे दार  त्याने आतील कडी लावून बंद केले होते. घराशेजारी असलेल्या  एका मित्राला माझा सायंकाळचा डब्बा सांग असे त्याने सायंकाळी पाचच्या दरम्यान सांगितले होते. तयार झालेला जेवणाचा डब्बा मृतकाचे दार बंद असल्यामुळे तो जोरजोराने आवाज देऊन सुद्धा मृतक दार उघडत नसल्याने मित्राला संशय आला त्याने डोकावून पाहिले असता वैभवने गळफास घेतल्याची त्याच्या लक्षात आले. घटनेची माहिती अकोलीचे पोलीस पाटील श्धात्रक यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना दिली. घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळालेली नाही.