
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित ५३ वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दि.१५ ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केलेल्या होत्या,सदर स्पर्धेत एकूण ३६ जिल्ह्यांच्या महिला व पुरुष संघांनी सहभाग घेतला असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी झालेले होते. या स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्हा महिला व्हॉलीबॉल संघाने ३६ जिल्हा संघांमध्ये अंतिम आठ (Super Eight)मध्ये प्रवेश करून पुणे येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. तसेच हा संघ लातूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा करिता सुद्धा पात्र झालेला आहे. पात्र महिला व्हॉलीबॉल संघाला महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अध्यक्ष असोसिएशनचे विजय डांगरे, सचिव संजय नाईक , कर्नाटक व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे माजी सहसचिव नंदा कुमार,महाराष्ट्र व्हॉलीबॉल असो.* संलग्नित * यवतमाळ जिल्हा पसिंग व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव अतुल नेवारे , छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त हुंडेकरी आरसीएफ मुंबई, श्री शिवाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श चंद्रशेखर कुलूपले ,उपाध्यक्ष शिवाजी विद्यालय यवतमाळ चे सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रशेखर आगलावे, प्राध्यापक सुनील कडू, मंडळाचे सचिव प्राचार्य श्री मनोज येंडे, मार्गदर्शक प्रा.अरुण वारारकर, प्रा. सुनील महिंद्रे, प्रा.प्रवीण भोयर , राळेगाव नगरी वृत्तपत्राचे संपादक व नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर, दिनेश रवाळे, अनिल डांगे, प्रमोद बोदडे श्री शिवाजी क्रीडा मंडळाचे व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ खेळाडू यांनी यवतमाळ जिल्हा महिलांच्या हॉलीबॉल संघाचे अभिनंदन केले आहे.
