साई पॉलिटेक्निक किन्ही ज येथे आमदार प्रा,डॉ अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजयजी काकडे यांनी आपल्या जन्मभूमी किन्ही ज येथे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षनासाठी महत्वाकांक्षी संकल्पना उभारून किन्ही या छोट्याशा गावात स्व अहिल्याबाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारण मंडळ कीन्ही ज या माध्यमातून साई पॉलिटेक्निक कॉलेज उभे केले,दि 11 ऑगष्ट रोजी या कॉलेजला 12 वर्ष पूर्ण झाले असल्याने त्यानिमित्त वर्धापणदिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या दिनानिमित्त राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा,डॉ अशोकरावजी उईके,जी,प सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे,सभापती प्रशांतभाऊ तायडे,यांच्या हस्ते कॉलेज परिसरात वृक्षरोपन करण्यात आले.ह्यावेळी जी,प सदश्या सौ प्रीतिताई काकडे कॉलेज चे संथापक अद्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजयजी काकडे,विनोदभाऊ मांडवकर,प्रफुल्लभाऊ काकडे,गजाननराव लढी,सह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.