बोर्डा गावात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन,जनतेनी लाभ घ्यावा:भूषण बुरीले ,सदस्य ग्राम पंचायत बोर्डा

शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.वरोरा शहरातील विविध भागात आरोग्य शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्यांना लाभ देण्याचे काम करण्यात आले .त्याचाच एक भाग म्हणून बोर्डा गावातील वॉर्ड क्रमांक 3 चे ग्राम पंचायत सदस्य भूषण बुरीले यांच्या तर्फे 1 ऑगस्ट रोजी बोर्डा गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी करून औषधे मोफत केल्या जाणार आहे.तसेच डोळ्यांचा चष्मा देखील अगदी माफक दरात देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला जाणार आहे.