
ढाणकी/ प्रतिनिधी : प्रवीण जोशी.
पत्रकार दिनाच्या औचित्याने ढाणकी शहर पत्रकार संघाची २०२३ सालासाठी नवनियुक्त कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी कैलास घुगरे यांची अध्यक्षपदी, दैनिक नवभारत चे प्रतिनिधी शेख फैयाज यांची उपाध्यक्षपदी, दैनिक विदर्भ मतदार चे विनोद गायकवाड यांची सचिव पदी, मारोती रावते कोषाध्यक्षपदी, पंजाब भुतनर सहसचिव पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.सर्वप्रथम पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष संजय भोसले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर निवडी वेळी शहरातील पत्रकार प्रशांत जोशी, मोहन कळमकर, उदय पुंडे, गजानन गंजेवाड, विकास चापके, प्रवीण जोशी, पंजाब कदम, सुनील अक्कावार, राहुल चोरे, नागेश महाजन व स्वप्नील चिकाटे हे उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या बैठकीचे संपूर्ण सूत्रसंचालन नागेश महाजन यांनी केले. उपस्थितांनी नवनियुक्त कार्यकारणीस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
